Smart News24x7

Online Latest Breaking News

पिस्तुलचा धाक दाखवीत दोन लाख रुपया ची लुट; आरोपी फरार

राजोली येथील मुसली यांच्या पेट्रोल पंपावर काल रात्री अज्ञात दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलचा धाक दाखवीत दोन लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली.
सविस्तर माहिती अशी की, मूल तालुक्यातील राजोली येथील विनोद मुसली यांचे विरव्हा येथे पेट्रोल पंप आहे. काल रात्री आठ वाजता चे दरम्यान दोन युवक पल्सर या दुचाकी वाहनावर बसून पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल पंपाचे मालक विनोद मुसली यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले दोन लाख रुपयासह दुचाकीवर बसविले. त्यांच्याकडून पैसे घेऊन, मुसली यांना विरव्हा जवळ सोडले आणि पैसे घेऊन पसार झाले.
याची माहिती सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात उपपोलिस निरीक्षक गोपीचंद नेरकर करीत आहेत.

 78 total views,  1 views today

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2021
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

error: Content is protected !!