Smart News24x7

Online Latest Breaking News

नवेगांव लोनखैरी जंगल परिसरात वाघाच्या हल्यात 60 वर्षीय इसम ठार

*घटना नवेगांव लोनखैरी कंपार्टमेंट नंबर 62 गोविंदपुर चक वनपरिक्षेञ सिंदेवाही येथे घडली.

*घटना शनिवार 17 जुलै सायंकाळी 7.00 वाजता घडली.

सिंदेवाही- सिंदेवाही वनपरिक्षेञ अंतर्गत येणाऱ्या नवेगांव लोनखैरी येथे वाघाने एका जेष्ठ नागरिकाला आपल्या तोंडाचा घास बनविला.
प्राप्त माहितीनुसार शेतकरी काशीनाथ पांडुरंग तलांडे वय. 60 मु. नवेगांव लोनखैरी सकाळी आपल्या घरुन शेतावर गेलेला होता. शेतावरील काम संपवून घरी वापस येत असतांना वाघाने मृतक तलांडे याच्यावर अचानक हल्ला केला त्यात त्याचा मृतु झाला. या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेञ अधिकारी अरुणकुमार गोंड, क्षेत्र सहायक हटवार व वन विभागाची टीम लगेच घटनास्थळी दाखल झाली. सोबत सिंदेवाही पोलिस स्टेशन येथील ठानेदार योगेश घारे, पोलीस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर, पोलिस गोपनीय विभाग प्रमुख रणधीर मदारे, गणेश मेश्राम आदि घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग व पोलिस विभाग झालेल्या घटनेचा पंचनामा करुन मृतकाचा शव पोस्टमार्टम करिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रवाना केला. मृतकाच्या शव चा पोस्टमार्टम आज सकाळी रविवार 18 जुलै ला कारण्यात आला व मृताकाचा शव परिवारातील व्यक्तिंच्या स्वाधीन कारण्यात आला. वनविभाग सिंदेवाहीकडून मृतकाच्या परिवाराला 25000 रूपयाची आर्थिक मदत कारण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतिचे वातावरण निर्माण झाले असुन वाघाचा बंदोबस्त करावा अशी मांगनी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

 102 total views,  1 views today

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2021
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

error: Content is protected !!