Smart News24x7

Online Latest Breaking News

दुहेरी हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला; आधी सुनेची केली हत्या, मग पत्नीला संपवले!

● चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजारी पत्नीच्या देखभालीत हयगय झाल्याने संतापलेल्या इसमाने सुन आणि पत्नीचा केला खून करून बल्लारपूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

● आजारी पत्नीला जेवण देण्यावरून सासरा आणि सून यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपीने सर्वप्रथम सुनेची गळा आवळून हत्या केली.

● आजारी पत्नीच्या देखभालीविषयी चिंता वाटल्याने पत्नीचाही खून केला. मुलाच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा झाला आहे. या धक्कादायक घटनाक्रमाने पोलिसही सुन्न झाले.

● शहरातील शिवाजी वार्डात राहणाऱ्या काजल डे (वय ५८) यांची पत्नी ‘आशा’ कर्करोगाने पीडित होती. दीर्घकाळ रूग्णालयात राहिल्यानंतर ती नुकतीच घरी परतली होती. डायलिसिसवर असलेल्या पत्नीची सुन प्रियंका व्यवस्थित देखभाल करत नसल्याने घरात वाद होते.

● आपले काम आटोपून घरी आलेल्या आरोपीने आजारी पत्नीला जेवण दिले का? याबाबत सुनेला विचारले. यावरून “वेळ मिळेल तेव्हा देईन” असे उत्तर मिळाल्यावर भांडणाला सुरुवात झाली.

● भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपी काजलने सुन प्रियंका हिचा गळा आवळून खून केला. मात्र आपण या कृतीने कोठडीत जाऊ असे लक्षात आल्यानंतर आपल्या पश्चात आजारी पत्नीची देखभाल कशी व्हावी,

● अशी चिंता सतावल्यानंतर त्याने मरणासन्न अवस्थेतील पत्नीचाही गळा आवळून खून केला. त्याच स्थितीत काजल डे याने बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठले व आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

● पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठत दोघींनाही रुग्णालयात नेले. मात्र पत्नीचा आधीच मृत्यू झाला होता. तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांनी सुनेचाही मृत्यू झाला.

● बल्लारपूर पोलीस ठाण्यात काजल डे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी काजल डे याला अटक करून बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 60 total views,  1 views today

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2021
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

error: Content is protected !!